संस्थेची उपक्रम


रिझन ट्रॅफिक फाउंडेशन व गोविंद व्यावसायिक शाखेचा जनजागृतीसाठी स्तुत्य उपक्रम
10th May 2025
Together we can !!!
- रिझन ट्रॅफिक फाउंडेशन व गोविंद व्यावसायिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सनसिटी रोडवर दर पंधरवड्याला राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमाला १० मे रोजी आणखी बळकटी मिळाली. या दिवशी या उपक्रमात नवीन कार्यकर्ते तसेच सज्जन शक्ती सामील झाली, ज्यामुळे या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे..
- उपक्रमाअंतर्गत कार्यकर्ते हातात वाहतूक नियमांचे फलक घेऊन रस्त्यावर उभे राहतात, नागरिकांशी संवाद साधतात, प्रबोधन करतात व वाहतूक नियंत्रणात मदत करतात. नागरिकही यास सकारात्मक प्रतिसाद देत असून, जागरूक नागरिक या उपक्रमाच्या गरजेबाबत कार्यकर्त्यांशी खुलेपणाने संवाद साधून आपली मते मांडत आहेत.
गुढीपाडवा व नववर्षानिमित्त सिटीकेअर फार्मसी चौकात वाहतूक नियमांची प्रतिकात्मक गुढी उभारली.
30th March 2025
"टुगेदर वी कॅन" हे ब्रीद वाक्य असलेल्या आणि वाहतूक नियमांची जनजागृती या विषयात प्रबोधन करण्यात आघाडी असलेल्या 'रिजन ट्रॅफिक फाऊंडेशन' या संस्थेच्यावतीने वाहतूक नियमांची गुढी उभारून नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून वाहतूककोंडी मुक्त परिसरासाठी कार्यरत राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
भावविश्व संवर्धन ट्रस्टच्या महिला कार्यकर्त्यांचाही या उपक्रमात सहभाग होता. हा उपक्रम दर १५ दिवसांनी वर्षभर राबवला जाणार असून, स्वयंसेवक आणि सज्जन नागरिक रिझनच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक जनजागृती आणि नियमन करणार आहेत.






सुरक्षित वाहतुकीसाठी प्रबोधन, जनजागृती
शिवजयंतीनिमित्त उपक्रमात 'रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन'च्या मावळ्यांचा मोठा सहभाग
18th March 2025
शिवजयंती साजरी करण्याचे हटके नियोजन करून येथील वाहतुककोंडीमुक्त परिसरासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर येऊन वाहतुकीबाबत प्रबोधन आणि जनजागृती केली. यात 'रिझन ट्रैफिक फाऊंडेशन' च्या मावळ्यांनी पुढाकार घेत छत्रपती शिवरायांना अनोखे अभिवादन केले.
येथील टिळक रोडवरील अभिनव कॉलेज चौकात खडक वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध नियमांचे बोर्ड घेऊन कार्यकर्ते नागरिकांना सातत्याने आवाहन करत होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसूनही येत होता. या कार्यक्रमात संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खडक वाहतूक विभागातील अधिकारी इजाक शेलार, अनुराधा कदम, संतोष यादव आणि विठ्ठल झेंडे यांनी सहकार्य आणि मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना आश्विनिकुमार शिंदे यांनी हे उपक्रम पुढेही कायम चालू राहतील आणि यासाठी नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
विठ्ठलवाडी नगरमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम
15th February 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोविंद व्यावसायिक मिलन शाखेच्या स्वयंसेवकांनी आणि रिझन ट्रॅफिक फाउंडेशनने सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौक आणि सनसिटी रस्त्यावरील विश्व मेडिकल चौक येथे रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन उपक्रम राबवला. या उपक्रमात स्वयंसेवकांनी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करत वाहतुकीचे नियमन केले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
भावविश्व संवर्धन ट्रस्टच्या महिला कार्यकर्त्यांचाही या उपक्रमात सहभाग होता. हा उपक्रम दर १५ दिवसांनी वर्षभर राबवला जाणार असून, स्वयंसेवक आणि सज्जन नागरिक रिझनच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक जनजागृती आणि नियमन करणार आहेत. *"Together We Can!!!"*






गणेशोत्सवात वाहतूक जनजागृती
16th September 2024
- हडपसर, पुणे येथील यशराज ग्रीन कासल गृहनिर्माण संस्थेने रिझन ट्रॅफिक फाउंडेशन च्या सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त वाहतूक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला. अनिकेत दिवेकर यांनी वाहतूक समस्या, अपघातांची कारणे व नियमभंग यावर माहितीपूर्ण सादरीकरण केले. शॉर्टफिल्म्स आणि आकडेवारीच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाय सांगण्यात आले..
- सायटीचे अध्यक्ष श्री अमोल नागवडे व सचिव श्री सागर कदम यांनी रिझनचे आभार मानताना, पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले

सन्मान
23th October 2018
-वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या वाहनचालकांचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित केला जातो. हेल्मेट, सीट बेल्ट वापरणारे आणि सिग्नल पाळणारे नागरिकांना प्रमाणपत्रे व प्रेरणादायी बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाते.
-हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व सांगण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवले जातात, ज्यामध्ये प्रबोधन रॅली, पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शन सत्रे आणि प्रत्यक्ष जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातात.
जनजागृती कार्यक्रम.
23th October 2018
रिझन ट्रॅफिक फाउंडेशनने रुग्णवाहिकेला मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. या उपक्रमांतर्गत, वाहनचालकांना रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पुणे शहरातील विविध ठिकाणी बॅनर आणि पोस्टर्स लावून जागरूकता वाढवली, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या मोहिमेचा व्यापक प्रसार करण्यात आला.
अनावश्यक हॉर्न वाजवू नये यासाठी जनजागृती कार्यक्रम – नो हॉर्न डे


नवले पुल वाहतूक सर्वेक्षण
26th February 2023
रिझन ट्रॅफिक फाउंडेशनने नुकतेच नवले पूल येथील वाहतुकीच्या समस्या याविषयी एक आठवडा सर्वेक्षण केले. यामधे विविध स्तरावरच्या समस्या आढळून आल्या. याचा सर्वेक्षण अहवाल पुणे पोलीस वाहतूक विभाग व महापालिका वाहतूक विभाग यांना देण्यात आला.




वाहतूक सुरक्षा अभियान – सामाजिक रक्षाबंधन उपक्रम
16th August 2019
रिझन ट्रॅफिक फाउंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "सामाजिक रक्षाबंधन" उपक्रमांतर्गत सिंहगड रोड, आनंद नगर चौकात वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात आले. "वाहतूक सुरक्षा बंधन" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात वाहनचालकांना वाहतूक नियमांची चित्ररूपी राखी लावून जनजागृती करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, आपुलकी पुणे व पोलीस प्रशासनानेही सक्रिय सहभाग घेतला.
रस्ता सुरक्षा अभियान – रिझन ट्रॅफिक फाउंडेशन
19th May 2018
रिझन ट्रॅफिक फाउंडेशन आणि दत्तवाडी वाहतूक विभागाने २८ एप्रिल ते ५ मे दरम्यान रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवला. सिंहगड रोडवरील विविध चौकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती केली गेली. "Thank You" स्टिकर्स देऊन नियम पाळणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध कार्यक्रमांमध्ये वाहतूक सुरक्षा आणि नियम पालनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.


रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्याबाबत जनजागृती
24th November 2017
रिझन ट्रॅफिक फाउंडेशनने रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत, रुग्णवाहिकेला योग्य मार्ग देण्यासाठी वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे शहरातील विविध चौकांमध्ये बॅनर आणि पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली, तसेच सोशल मीडियावरही या मोहिमेचा प्रसार करण्यात आला.
पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या “वाहतूक जन-जागृति दिन”
8th October 2016
पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या “वाहतूक जन-जागृति दिन” मध्ये सिंहगड वाहतूक समस्या निवारण संस्थे ने सक्रिय सहभाग घेतला. संस्थेचे २५ सदस्य दांडेकर पूल आणि महालक्ष्मी मंदिर चौक येथे मानवी साखळीत सहभागी झाले आणि १२०० वाहतूक नियम जागरूकता स्टिकर्स विविध वाहनांवर लावले. संस्थेच्या सदस्यांनी वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा केली. श्री एम. जी. करपे यांनी संस्थेच्या सहभागाचे कौतुक केले.




वाहतूक सुरक्षा बंधन अभियान
21st August 2016
सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण संस्थे ने रक्षा-बंधनाच्या औचित्याने १८ ते २० ऑगस्ट २०१६ दरम्यान वाहतूक सुरक्षा बंधन अभियान राबवला. हिंगणे चौक आणि संतोष हॉल चौकात नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याची जाणीव करून देण्यासाठी राखी बांधली गेली. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम तोडणाऱ्यांना राखी बांधून नियम पाळण्याची जागरूकता दिली. शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. काही नागरिकांनी त्यांच्या चुकांची कबुली दिली आणि नियम पाळण्याचे वचन दिले.
वाहतूक समस्या निवारण संस्थेची वर्षपूर्ती
3rd August 2016
सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण संस्थेने आपल्या कार्याची वर्षपूर्ती ३ ऑगस्ट २०१६ रोजी हिंगणे चौकात वाहतूक नियमन व प्रबोधन करून साजरी केली. सकाळी ९:३० ते १०:३० या उपक्रमात संस्थेचे सदस्य सहभागी झाले. त्यानंतर ६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत वर्धापनदिन साजरा करण्यात आला.




आषाढी एकादशीसाठी प्रती-पंढरपूर येथे वाहतूक नियमन
16th July 2016
आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील विठ्ठलवाडी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण संस्थेने १० ते ८:३० या वेळेत वाहतूक नियमन केले. यामुळे भाविकांना रस्ता ओलांडताना मोठी मदत झाली. वयोवृद्ध आणि महिलांनी संस्थेच्या सदस्यांचे विशेष कौतुक केले. तसेच, दत्तवाडी पोलिस निरीक्षक श्री. करपे यांनीही संस्थेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.
वाहतूक नियमन करून वारकरी बांधवांची सेवा
1st July 2016
|| ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ||
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले. पर्वती पायथा, सिंहगड रोड येथे वारकऱ्यांना रहदारीचा त्रास होऊ नये म्हणून सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण संस्थेने सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत वाहतूक नियमन केले. यामुळे वारकरी, पुणेकर आणि वाहतूक पोलिसांना मोठी मदत झाली. पुणेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. करपे यांनी संस्थेच्या सदस्यांचे विशेष आभार मानले.


प्रभोधनात्मक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
9th April 2016
वाहतूक समस्या निवारण संस्थेने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संतोष हॉल चौक, आनंदनगर येथे प्रभोधनात्मक गुढी उभारून वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी वाहतुकीच्या सूचनांचे फलक लावले. या उपक्रमाला दत्तवाडी वाहतूक विभागाच्या प्रमुख कल्पना जाधव यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्था सदस्यांकडून दररोज वाहतूक नियमन करून पोलिसांना सहकार्य केले जाते, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.




वाहतूक नियम पाळणार्यांचा तिळगूळ वाटून सन्मान
13th March 2016
वाहतूक समस्या निवारण संस्थेने रस्ता सुरक्षा सप्ताह व संक्रांतीच्या निमित्ताने सिंहगड रोडवरील विविध चौकात वाहतूक नियमन, प्रभोधन आणि नियम पाळणाऱ्या नागरिकांचा तिळगूळ वाटून सन्मान केला.
या उपक्रमात तू. गो. गोसावी विद्यालयाच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी माणिकबाग, आनंदनगर, हिंगणे, विश्रांतीनगर आणि राजाराम पूल चौक येथे वाहतूक नियमांचे फलक धरून नागरिकांचे प्रबोधन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि संस्थेच्या सदस्यांनीही मार्गदर्शन केले.
वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमनासंदर्भात चित्रफीत दाखवण्यात आली. वाहतूक पोलिस निरीक्षक म. ग. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


"शिवसागर फेज १" मधील बालचमुंनी वाहतूक नियमन कार्याला उत्साही पाठिंबा
26th September 2015
सिंहगड रोडवरील "शिवसागर फेज १" सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील बालचमुंनी वाहतूक नियमन व प्रबोधनाच्या उपक्रमाला उत्साही सहभाग घेतला. लहान मुलांनी संतोष हॉल चौकात वाहतूक नियमांचे फलक घेतले आणि मार्गदर्शनानुसार कार्य केले.
संस्थेचे कार्यकर्त्यांनी मुलांना वाहतूक नियमांची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. बालचमुंच्या या सक्रिय सहभागामुळे संस्थेच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
"सुंदर सहवास फेज १" मध्ये वाहतूक नियमन व प्रबोधन उपक्रमाला उत्साही पाठिंबा
26th September 2015
""सुंदर सहवास फेज १" सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांनी संस्थेच्या वाहतूक नियमन व प्रबोधन उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला. बालचमु, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी संतोष हॉल चौकात सकाळी वाहतूक नियमनात सहभाग घेतला, ज्यात मुलांनी वाहतुकीच्या सूचनांचे फलक तयार केले होते. ७३ वर्षांच्या जेष्ठ सभासद आणि ६ वर्षांच्या मुलींनीही सहभाग घेतला. संस्थेचे कार्यकर्त्यांनी अपघातात जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडवले. कार्यकर्त्यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. "सुंदर सहवास फेज १" मधील सर्व सभासदांचे संस्थेच्या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.




वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्री एम.जी. काळे ह्यांच्या हस्ते उद्घाटन व काळेसाहेबांकडून कार्यकर्त्यांना वाहतूक नियमना बद्दल मार्गदर्शन
22nd August 2015
वाहतूक समस्या निवारण संस्थेने आपल्या कार्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्री एम.जी. काळे यांच्या हस्ते उद्घाटन आयोजित केले. या वेळी, श्री काळे यांनी संस्थेचे कार्य खूपच महत्त्वाचे असल्याचे सांगितले आणि कार्यकर्त्यांना वाहतूक नियमांचे पालन कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांचे उत्साहवर्धन झाले, तसेच भविष्यात वाहतूक समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली.
वाहतूक नियमन व प्रभोधन करताना संस्थेचे कार्यकर्ते
22nd August 2015
संस्थेचे कार्यकर्ते वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे काम करतात. ते वाहनचालकांना सुरक्षित चालण्याचे, हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, आणि पादचाऱ्यांना योग्य रस्ता ओलांडण्याचे महत्त्व समजावून सांगतात. कार्यकर्ते फलक, पंपलेट्स आणि दृश्यीय सूचनांचा वापर करून लोकांना जागरूक करतात. त्यांच्या समर्पणामुळे, नागरिकांना वाहतूक नियम पाळणे सोपे आणि सुरक्षीत वाटते, ज्यामुळे एक सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होते.

