रिझन ट्रॅफिक फाउंडेशन (रजि.)
English| मराठी

संस्थेची कार्ये


रस्ते सुरक्षा परिसंवाद

9th February 2025

रिझनतर्फे कॅडकॅमब्रीज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, कोथरूड , पुणे या इंस्ट्यूट्यूट मध्ये इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांविषयी नुकताच परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



रिझनच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधत रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांची माहिती दिली. तसेच विविध कारणांनी होणारे अपघात कसे टाळता येतील / कमी करता येईल याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.






वाहतूक प्रबोधन कार्यशाळा व परिसंवाद

11th January 2025

रिझन ट्रॅफिक फाउंडेशन व स्पंदन संस्थेच्या सहयोगाने कै. तुकाराम धोंडिबा पठारे विद्यालय (मराठी माध्यम) येथे आज इयत्ता ८वी च्या वर्गासाठी प्रबोधन कार्यशाळा व परिसंवाद घेण्यात आला. ८वी चे २०० विद्यार्थी, वर्गशिक्षिका व शाळेचे पदाधिकारी यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.


वाहतूक नियम, वाहतूक समस्या, नागरिकांनी वाहन चालवताना व पायी चालताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले. वाहतूक नियमांची चन्हे, रस्त्यावरील पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग चे पट्टे व त्यांचा अर्थ याची माहिती देण्यात आली. तसेच याबाबत विद्यार्थ्यांनीही विचारलेल्या प्रश्नांना छान उत्तरे दिली. यावेळी विध्यार्थ्यांना काही विडिओ क्लिप्स व प्रेसेंटेशन च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.




मेळाव्यांचे आयोजन

3rd January 2022

- वाहन परवाना मेळावे

रिझन ट्रॅफिक फाउंडेशन पुणे संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सर्व शिबीरार्थींचे आणि कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मन: पुर्वक धन्यवाद



शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

23rd September 2018

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष संवाद सत्र आयोजित केले जातात. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावरील सुरक्षिततेचे महत्त्व, वाहतुकीशी संबंधित नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित करण्याबरोबरच त्यांनी आपल्या पालकांना व समाजाला याविषयी जागरूक करण्यास मदत करावी, असा संदेश दिला जातो.

विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील वाहतूक समस्या ओळखता याव्यात आणि त्यावर उपाय शोधता यावेत, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात




रिझन ट्रॅफिक फॉउंडेशनच्या वेबसाईटचे उदघाटन

reaason.org
9th July 2022

रिझन ट्रॅफिक फाउंडेशनच्या वाहतूक प्रबोधन कार्याचा विस्तार करण्यासाठी संस्थेची वेबसाईट सुरू करण्यात आली. याचे उद्घाटन रवींद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला वाहतूक पोलीस अधिकारी उदयसिंग शिंगाडे आणि प्राचार्य सूर्यवंशी सर उपस्थित होते. शिंगणापूरकर यांनी नागरिकांनी स्वतःहून वाहतूक नियम पाळण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.


ड्रायव्हिंग लायसन्स शिबीर

3rd January 2022

रिझन ट्रॅफिक फाउंडेशनतर्फे ड्रायव्हिंग लायसन्स शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद** रिझन ट्रॅफिक फाउंडेशन, पुणेच्या वतीने ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व शिबीरार्थींनी आवश्यक कागदपत्रे, वाहतूक नियम आणि लायसन्स प्रक्रियेची माहिती घेतली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी मोठे सहकार्य केले. उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन आणि जबाबदार वाहनचालना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रिझन ट्रॅफिक फाउंडेशनतर्फे सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!